अखिल महाराष्ट्र आंतर क्‍लब टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा; पीवायसी अ व पीवायसी क यांच्यात लढत

पुणे- पीवायसी अ संघाने सीसीआय अ संघाचा 22-8 असा पराभव करताना एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्‍लब टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्यातर्फे व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्ट येथे सुरू आहे.

अखेरच्या साखळी सामन्यात पीवायसी अ संघाने सीसीआय अ संघाचा 22-8 असा पराभव केला. या सामन्यातील 110 अधिक वयोगटातील दुहेरी लढतीत पीवायसी क संघाच्या हिमांशू गोसावी व डॉ.जमेनिस यांना सीसीआयच्या ड्रिंडा दयाल व सागर इंजिनिअर या जोडीने 4-6 असे पराभूत करून संघाला आघाडी मिळवून दिली. 90अधिक गटातील दुहेरी लढतीत पीवायसीच्या पराग नाटेकर व हेमंत बेंद्रे या जोडीने सीसीआयच्या इम्रान व निखिल संपत यांचा 6-2 असा पराभव करून ही आघाडी कमी केली.

त्यानंतर खुल्या दुहेरी गटात अभिषेक ताम्हाणेने रितू कुलकर्णीच्या साथीत सीसीआयच्या जयेश संपत व प्रसाद प्रधान यांचा 6-0 असा पराभव केला. तर खुल्या दुहेरी गटात पीवायसीच्या प्रशांत सुतार व केतन धुमाळ यांनी लव कोठारी व विक्रम संपत यांचा 6-0 असा सहज पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

सविस्तर निकाल- साखळी फेरी- पीवायसी अ वि.वि. सीसीआय अ 22-8 (110+ वयोगट दुहेरी गट- हिमांशू गोसावी-डॉ.जमेनिस पराभूत वि. ड्रिंडा दयाल-सागर इंजिनिअर 4-6; 90+ गट- पराग नाटेकर-हेमंत बेंद्रे वि.वि. इम्रान-निखिल संपत 6-2; खुला दुहेरी गट- अभिषेक ताम्हाणे-रितू कुलकर्णी वि.वि. जयेश संपत-प्रसाद प्रधान 6-0; खुला दुहेरी गट- प्रशांत सुतार-केतन धुमाळ वि.वि. लव कोठारी-विक्रम संपत 6-0).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)