अखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; आकाश, सत्चित, सचिन, अलेक्‍स, यांचे संघर्षपूर्ण विजय

पुणे – करुण प्रदीप, आकाश पाडाळीकर, सत्चित जामगांवकर, सचिन संचेती, अलेक्‍स्‌ रेगो व नीलेश पाटणकर यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवताना द क्‍यू क्‍लब तर्फे आयोजित पहिल्या स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेत आगेकूच केली.

विमाननगर येथील क्‍यु क्‍लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुण्याच्या करुण प्रदीप याने सौरभ अय्यागिरी याचा 62-24, 28-37, 46-21 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली. एपीज्‌ क्‍लबच्या आकाश पाडाळीकर याने अनमोल पंडिता याचा 34-60, 61-14, 17-0 असा पराभव केला. तसेच पुण्याच्या नीलेश पाटणकर याने अमरदीप घोडके याचा 35-61, 64-49, 43-34 असा पराभव करून आगेकूच केली.

अत्यंत चुरशीच्या सामन्यात सत्चित जामगांवकर याने संदील हरलियाली याचा 65-26, 48-49, 58-22 असा पराभव केला. सुमारे पावणे दोन तास चाललेल्या या सामन्यात सत्चितने पहिली फ्रेम 65-26 अशी जिंकून 1-0 आघाडी घेतली. दुसऱ्या फ्रेममध्ये संदीलने केवळ एका गुण फरकाने 49-48 फ्रेम जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली. निर्णायक फ्रेममध्ये सत्चितने संदीलला फारशी संधी न देता 36 गुणांच्या फरकाने 58-22 अशा फ्रेमसह विजय मिळवला.

पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लबच्या सचिन संचेती याने कीर्ती सिरसाला याचा 64-79, 53-29, 81-48 असा पराभव केला. या सामन्यातही सचिन 0-1 असा पिछाडीवर होता. पण पिछाडीवरून जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत त्याने दुसरी आणि तिसरी फ्रेम 53-29, 81-48 अशी जिंकून सामन्यात विजय मिळवला. क्‍यू क्‍लबच्या अलेक्‍स्‌ रेगो याने रवि सातोडे याचा 58-46, 32-36, 56-18 असा पराभव करून विजयी सलामी दिली.

कैवल्य जाधव याने सलग दोन विजयाची नोंद करताना आजचा दिवस गाजविला. कैवल्यने पहिल्या सामन्यांत अभिषेक सातव याचा 58-19, 41-33 असा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात प्रतीक चव्हाण याच्यावर 49-08, 47-24 अशी सरळ फ्रेममध्ये मात केली. तसेच क्‍यू क्‍लबच्या अभिषेक बोरा याने नितेश माने याचा 61-19, 70-40 असा पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

   सविस्तर निकाल –

गटसाखळी फेरी – करुण प्रदीप वि.वि. सौरभ अय्यागिरी 62-24, 28-37, 46-21; आकाश पाडाळीकर वि.वि. अनमोल पंडिता 34-60, 61-14, 17-0; आशिष चावला वि.वि. रानू सुतार 58-23, 67-35; सत्चित जामगांवकर वि.वि. संदील हरलियाली 65-26, 48-49, 58-22; कैवल्य जाधव वि.वि. अभिषेक सातव 58-19, 41-33; अभिषेक बोरा वि.वि. नितेश माने 61-19, 70-40; सचिन संचेती वि.वि. कीर्ती सिरसाला 64-79, 53-29, 81-48;
अलेक्‍स्‌ रेगो वि.वि. रवि सातोडे 58-46, 32-36, 56-18; अमरदीप घोडके वि.वि. चिंतामणी जाधव 73-25, 51-41; कैवल्य जाधव वि.वि. प्रतीक चव्हाण 49-08, 47-24; नीलेश पाटणकर वि.वि. अमरदीप घोडके 35-61, 64-49, 43-34.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)