अखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; विवेक, विजय, ओमर उपउपान्त्यपूर्व फेरीत

पुणे – अमरदीप घोडके, विवेक मेहत्रा, विजय नचानी, ओमर अहमद, योगेश शर्मा, हसन बदामी व भरत सिसोडिया यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव कताना पहिल्या स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अमोल अब्दागिरी व गौरव पतंगे या डेक्‍कन जिमखानाच्या खेळाडूंना मात्र पराभव पत्करावा लागला. द क्‍यू क्‍लब यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विमाननगर येथील क्‍यू क्‍लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत क्‍यू क्‍लबच्या अमरदीप घोडके याने सोनू मातंग याचा 42-77, 47-20, 56-77, 66-17, 94-77 असा चुरशीच्या लढतीत पराभव करून आगेकूच केली. तसेच पुण्याच्या विवेक मेहत्रा याने कोलकाताच्या पिनाके बॅनर्जी याचा 26-50, 52-33, 26-60, 55-23, 40-28 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपउपान्त्यपूर्व फेरीत आगेकूच केली.

आणखी एका लढतीत कोईमतूरच्या विजय नचानीने चंदीगढच्या रणवीर दुग्गल याचा 52-58, 87-06, 77-04, 56-22 असा पराभव करून उपउपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. तसेच पुण्याच्या दोन खेळाडूंमध्ये झालेल्या लढतीत कनिष्क जाधवने मोहित वर्माचे आव्हान 55-34, 56-44, 73-37 असे सरळ फ्रेम्समध्ये संपुष्टात आणत आगेकूच केली.

सविस्तर निकाल –

बाद फेरी – अमरदीप घोडके (क्‍यू क्‍लब) वि.वि. सोनु मातंग (स्नूकर क्‍लब) 42-77, 47-20, 56-77, 66-17, 94-77; विवेक मेहत्रा (पुणे) वि.वि. पिनाके बॅनर्जी (कोलकाता) 26-50, 52-33, 26-60, 55-23, 40-28; कनिष्क जाधव (पुणे) वि.वि. मोहित वर्मा (पुणे) 55-34, 56-44, 73-37; सिद्धेश मुळे (मुंबई) वि.वि. साद सय्यद (क्‍यू क्‍लब) 61-58, 22-60, 60-31, 12-63, 75-51; अलि हसन (क्‍यू क्‍लब) वि.वि. धवल गढवी (पुणे) 15-80, 47-48, 66-56, 73-52, 56-46; अनुपम झा (क्‍यू क्‍लब) वि.वि. अमोल अब्दागिरी (डेक्‍कन जिमखाना) 56-44, 84-26, 58-08;

अमित पराशर (क्‍यू क्‍लब) वि.वि. शुभम रोकडे (सांगली) 31-63, 57-49, 68-13, 59-08; विजय नचानी (कोईमतूर) वि.वि. रणवीर दुग्गल (चंडीगढ) 52-58, 87-06, 77-04, 56-22; ओमर अहमद (मुंबई) वि.वि. यश भरडभुंजे (न्यु क्‍लब) 57-14, 39-52, 73-46, 28-41, 68-41; योगेश शर्मा (कॉर्नर पॉकेटस्‌) वि.वि. गौरव पतंगे (डेक्‍कन जिमखाना) 77-48, 48-50, 67-31, 56-22; हसन बदामी (मुंबई) वि.वि. अन्शुल दांडेकर (क्‍यू क्‍लब) 64-22, 55-54, 72-24; भरत सिसोडिया (मध्यप्रदेश) वि.वि. प्रतिबन बी. (दिल्ली) 82-60, 81-32, 45-43.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)