अखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; अनुज, शिवम, आनंद उपउपान्त्यपूर्व फेरीत

पुणे – दिल्लीचा अनुज उप्पल, मुंबईचा शिवम अरोरा, क्‍यू मास्टर्स क्‍लबचा आनंद रघुवंशी, क्‍यू क्‍लबचा ज्ञानराज सथपती व औरंगाबादचा कृष्णराज अरकोड यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पहिल्या स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. द क्‍यू क्‍लब यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विमाननगर येथील क्‍यू क्‍लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील आजच्या सर्वात चुरशीच्या लढतीत ज्ञानराजन सत्पती याने पूना क्‍लबच्या जमशेद गारडा याचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. ज्ञानराजन याने पहिल्या दोन फ्रेम 54-37, 43-30 असे जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर जमशेद यानेही सलग दोन फ्रेम 75-46, 60-16 असे जिंकून सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधली. निर्णायक फ्रेममध्ये ज्ञानराजन याने जमशेद याला कोणतीही संधी न देता 58-33 अशा गुणांसह ही फ्रेम व सामना खिशात घातला.

भारताचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू अनुज उप्पल याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना क्‍यू क्‍लबच्या सद्दाम शेख याचा 81-03, 60-20, 61-10 असा सहज पराभव केला. तसेच आनंद रघुवंशी याने आशिष चावला याचा 73-29, 51-17, 75-01 असा एकतर्फी पराभव केला. राष्ट्रीय खेळाडू शिवम अरोरा याने कैवल्य चव्हाण याचा 69-60, 80-51, 85-43 असा सहज पराभव करून अंतिम 16 खेळाडूंमधील आपले स्थान निश्‍चित केले.

त्याचप्रमाणे हसन बदामी, अन्शुल दांडेकर, मोहित वर्मा, गणेश जाधव, अमित गुनानी, संतोष धर्माधिकारी, अमिर पराशर, शुभम रोकडे, ओंकार अहमद, हुसेन खान, लियाकत अली, रोविन डिसुझा, विजय नचानी, रणवीर दुग्गल, नरेश अहीर, निसर्ग पटेल, अनुपम झा, अमोल अब्दागिरी, नीलेश पाटणकर, दिनेश कुमार, अभिजीत रानडे, अली हसन आणि धैर्य भंडारी या खेळाडूंनी चमकदार विजयाची नोंद करताना आपापल्या गटातून बाद फेरीत प्रवेश केला.

सविस्तर निकाल –

बाद फेरी – अनुज उप्पल (दिल्ली) वि.वि. सद्दाम शेख (क्‍यू क्‍लब) 81-03, 60-20, 61-10; आनंद रघुवंशी (क्‍यू मास्टर्स) वि.वि. आशिष चावला (न्यू क्‍लब) 73-29, 51-17, 75-01; शिवम अरोरा (मुंबई) वि.वि. कैवल्य चव्हाण (क्‍यू क्‍लब) 69-60, 80-51, 85-43; ज्ञानराजन सत्पती (क्‍यू क्‍लब) वि.वि. जमशेद गारडा (पूना क्‍लब) 54-37, 43-30, 46-75, 16-60, 58-33; कृष्णराज अरकोड (औरंगाबाद) वि.वि. अमोल राईकर (क्‍यू क्‍लब) 1-0, 59-20, 65-17.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)