अखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; धैर्य, शहाबाज, राहुल, हसन यांचे विजय

पुणे – धैर्य भंडारी, शहाबाज खान, राहूल सचदेव, हसन बदामी, अनुज उप्पल आणि शिवम अरोरा या मुंबईच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा एकतर्फी पराभव करून पहिल्या स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेत आगेकूच केली. द क्‍यू क्‍लब यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विमाननगर येथील क्‍यू क्‍लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील संघर्षपूर्ण लढतीत राष्ट्रीय खेळाडू शहाबाज खान याने पुण्याच्या धवल गझवी याचा 47-62, 73 (55)-05, 60-17 असा झुंजार पराभव केला. शहाबाज याने आपल्या विजयात दुसऱ्या फ्रेममध्ये 55 गुणांचा ब्रेकही नोंदविला. दुसऱ्या सामन्यात मुंबईच्याच शिवम अरोरा याने न्यू क्‍लबच्या आकाश जोशी याच्यावर 60-39, 23-58, 83-09 अशा संघर्षपूर्ण विजयाची नोंद केली.

एकतर्फी ठरलेल्या लढतीत राष्ट्रीय खेळाडू हसन बदामी याने वैभव बजाज याचा 77-09, 79-18 असा फडशा पाडला. तर धैर्य भंडारी याने गौरव अय्यागिरी याचा 61-11, 68-34 असा सहज पराभव करून आगेकूच केली. माजी कुमार राष्ट्रीय खेळाडू राहुल सचदेव यानेही नागपूरच्या सुनील दडयाली याचा 75-05, 85-16 असा सहज पराभव करून विजयी सलामी दिली.

आणखी एका सामन्यात मध्यप्रदेशच्या भरत सिसोडिया याने वेदांत जोशी याचा 51-50, 68-25 असा धुव्वा उडविला. तर विजय नचानी याने अनमोल पंडीता याचा 74-20, 66-40 असा सहज पराभव केला. तसेच मुंबईच्या अनुज उप्पलने सातारच्या दीपक पाटीलचे आव्हान 76-01, 64-28 अशा विजयासह मोडून काढत आगेकूच केली.

 सविस्तर निकाल –

गटसाखळी फेरी – करण मल्होत्रा (न्यू क्‍लब) वि.वि. आकाश पाडाळीकर (एपीज्‌) 56-34, 64-47; रोहन कोठारे (क्‍यू क्‍लब) वि.वि. वीरेन शर्मा (कॉर्नर पॉकेटस्‌) 62-33, 62-54; शिवम अरोरा (मुंबई) वि.वि. आकाश जोशी (न्यू क्‍लब) 60-39, 23-58, 83-09; अमित गुनानी (सांगली) वि.वि. अमर राईकर (क्‍यू क्‍लब) 42-32, 54-42; धैर्य भंडारी (मुंबई) वि.वि. गौरव अय्यागिरी (क्‍यू क्‍लब) 61-11, 68-34; शहाबाज खान (मुंबई) वि.वि. धवल गझवी (पुणे) 47-62, 73(55)-05, 60-17; राहुल सचदेव (मुंबई) वि.वि. सुनील दडयाली (नागपूर) 75-05, 85-16; हसन बदामी (मुंबई) वि.वि. वैभव बजाज (क्‍यू क्‍लब) 77-09, 79-18; भरत सिसोडिया (मध्यप्रदेश) वि.वि. वेदांत जोशी (न्यू क्‍लब) 51-50, 68-25; विजय नचानी (क्‍यू क्‍लब) वि.वि. अनमोल पंडिता (क्‍यू मास्टर्स) 74-20, 66-40; अनुज उप्पल (मुंबई) वि.वि. दीपक पाटील (सातारा) 76-01, 64-28.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)