अखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; कृष्णराज अरकोडचा बाद फेरीत प्रवेश

पुणे – औरंगाबादच्या कृष्णराज अरकोड याने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना पहिल्या स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. द क्‍यू क्‍लब यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विमाननगर येथील क्‍यू क्‍लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत कृष्णराज अरकोड याने क्‍यू क्‍लबच्या लोगस रेगो याचा 67-42, 59-22 असा पराभव करून स्पर्धेची बाद फेरी गाठली. कृष्णराजचा हा सलग दुसरा विजय ठरला. तसेच पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लबच्या अमोल अब्दागिरी याने न्यू क्‍लबच्या विशाल पांचाल याचा 59-25, 81-05 असा पराभव करून विजयी सलामी दिली.

आणखी एका सामन्यात न्यू क्‍लबच्या मयंक गुप्ता याने क्‍य क्‍लबच्या अन्शुमन दांडेकर याचा 73-42, 42-73, 55-30 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. डेक्‍कन जिमखानाच्या सतीश कराड याने गुजरातच्या नीरज निसावा याचा 61-41, 63-72, 68-66 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली.

न्यू क्‍लबच्या साद सय्यद याने करण जे. याचा 89 (66)-05, 64-30 असा सहज पराभव केला. सादने पहिल्या फ्रेममध्ये 66 गुणांचा ब्रेकही नोंदविला. क्‍यू स्पोर्टसच्या राज अगरवाल याने न्यू क्‍लबच्या वेदांत जोशी याचा 66-46, 28-57, 61-41 असा पराभव करून आगेकूच केली. तसेच पूना क्‍लबच्या विग्नेश संघवी याने चिपळूणच्या ओंकार गोरे याचा 49-34, 56-62, 73-34 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.

सविस्तर निकाल-

अमोल अब्दागिरी (पीवायसी) वि.वि. विशाल पांचाल (न्यू क्‍लब) 59-25, 81-05, कृष्णराज अरकोड (औरंगाबाद) वि.वि. लोगस रेगो (क्‍यू क्‍लब) 67-42, 59-22, मयंक गुप्ता (न्यू क्‍लब) वि.वि. अन्शुमन दांडेकर (क्‍यू क्‍लब) 73-42, 42-73, 55-30, राहुल पाध्ये (पीवायसी) वि.वि. प्रीतम पवार (नागपूर) 43-41, 35-25, सतीश कराड (डेक्‍कन जिमखाना) वि.वि. निरज निसावा (गुजरात) 61-41, 63-72, 68-66, साद सय्यद (न्यू क्‍लब) वि.वि. करण जे. (पुणे) 89(66)-05, 64-30, राज अगरवाल (क्‍यू स्पोर्टस्‌) वि.वि. वेदांत जोशी (न्यू क्‍लब) 66-46, 28-57, 61-41, नसर पटेल (गुजरात) वि.वि. सिद्धेश मुळे (मुंबई) 47-31, 43-32, सिद्धेश मुळे (मुंबई) वि.वि. अन्शुमन दांडेकर (क्‍यू क्‍लब) 66-43, 61-42, विग्नेश संघवी (पूना क्‍लब) वि.वि. ओंकार गोरे (चिपळूण) 49-34, 56-62, 73-34.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)