अखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; जमशेद गारडा, सुशांत खाडे यांचे विजय

पुणे – न्यू क्‍लबचा नरेश अहीर, पूना क्‍लबचा जमशेद गारडा, क्‍यू क्‍लबचा प्रतीक चव्हाण, ठाण्याचा सुशांत खाडे, कॉर्नर पॉकेटसचे गिरीश गिरी आणि दत्ता राज यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर संघर्षपूर्ण विजय मिळवताना पहिल्या स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.

द क्‍यू क्‍लब यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा विमाननगर येथील क्‍यू क्‍लब येथे सुरू आहे. स्पर्धेतील आज झालेल्या पहिल्या सामन्यात नरेश अहीर याने रणजीत कचरे याचा 28-54, 60-17, 69-49 असा पराभव केला. सामन्यामध्ये रणजीत याने सुरेख सुरूवात करताना 54-28 अशी पहिली फ्रेम जिंकली. 0-1 अशा पिछाडीवरून खेळताना नरेश अहीर याने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. नरेशने दुसरी आणि तिसरी फ्रेम 60-17, 69-49 अशी जिंकून सनसनाटी विजयाची नोंद केली.

क्‍यू क्‍लबच्या प्रतीक चव्हाण याने अभिषेक सातव (न्यू क्‍लब) याचा 23-62, 48-40, 62-47 संघर्षपूर्ण पराभव केला. 0-1 अशा पिछाडीवरून प्रतिक याने दुसरी आणि तिसरी फ्रेम 48-40, 62-47 अशी जिंकून सनसनाटी विजयाची नोंद केली. पूना क्‍लबच्या जमशेद गारडाने मुकेश भोसले याचा 49-12, 16-48, 58-05 असा तिसऱ्या फ्रेममध्ये पराभव केला.

तर ठाण्याच्या सुशांत खाडे याने आशिष होले (आरसीबीसी) याचा 20-29, 66-35, 79-21 असा पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. कॉर्नर पॉकेटसच्या गिरीश गिरी याने क्‍य क्‍लबच्या सिद्धार्थ टेंभे याचा 78-52, 13-57, 62-11 असा पराभव केला. कॉनर्र पॉकेटस्च्या दत्ता राजसाठी आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा ठरला. शुभम लोहकरे (क्‍यू क्‍लब) याने दत्ता राज याचा 55-29, 72-33 असा सहज पराभव केला. नंतरच्या सामन्यात दत्ता राज येसू पिल्ले (क्‍यू क्‍लब) याचा 62-23, 29-65, 56-01 असा संघर्षपूर्ण विजय मिळवत आगेकूच केली.

सविस्तर निकाल –
गटसाखळी फेरी – ज्ञानराज सत्पथी (क्‍यू क्‍लब) वि.वि. विशाल राजानी (क्‍यू क्‍लब) 32-46, 56-39, 63-56; धवल गढवी (एपीज्‌ क्‍लब) वि.वि. सिद्धांत पी. (पुणे) 65-26, 52-40; सैफ शेख (कॉर्नर पॉकेटस्‌) वि.वि. विपीन संकपाळ (पूना क्‍लब) 66-49, 33-62, 61-54; नरेश अहीर (न्यू क्‍लब) वि.वि. रणजीत कचरे (क्‍यू क्‍लब) 28-54, 60-17, 69-49; जमशेद गारडा (पूना क्‍लब) वि.वि. मुकेश भोसले (क्‍यू क्‍लब) 49-12, 16-48, 58-05;

प्रतीक चव्हाण (क्‍यू क्‍लब) वि.वि. अभिषेक सातव (न्यू क्‍लब) 23-62, 48-40, 62-47; अंकुश प्रसाद (147 क्‍लब) वि.वि. येसू पिल्ले (क्‍यू क्‍लब) 49-36, 55-17; लव बोरिचा (मुंबई) वि.वि. निखिल खोब्रागडे (होरायझन) 51-08, 60-16; विशाल रजानी (147 क्‍लब) वि.वि. दीपक पाटील (सातारा) 32-09, 45-42; सुशांत खाडे (ठाणे) वि.वि. आशिष होले (आरसीबीसी) 20-29, 66-35, 79-21; गिरीश गिरी (कॉर्नर पॉकेटस्‌) वि.वि. सिद्धार्थ टेंभे (क्‍यू क्‍लब) 78-52, 13-57, 62-11; शुभम लोहोकरे (क्‍यू क्‍लब) वि.वि. दत्ता राज (कॉर्नर पॉकेटस्‌) 55-29, 72-33; दत्ता राज (कॉर्नर पॉकेटस्‌) वि.वि. येसू पिल्ले (क्‍यू क्‍लब) 62-23, 29-65, 56-01.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)