अखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा; नीलेश पाटणकर, अभिषेक बोरा यांचा बाद फेरीत प्रवेश

पुणे  – ठाण्याचा नीलेश पाटणकर आणि यजमान क्‍यू क्‍लबचा अभिषेक बोरा यांनी साखळी फेरीतील सर्व सामने जिंकताना पहिल्या स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. द क्‍यू क्‍लब यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विमाननगर येथील क्‍यू क्‍लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत नीलेश पाटणकर याने पुण्याच्या नितीन पोतदार याचा 54-58, 68-28, 62-48 असा पराभव केला. प गटातून खेळणाऱ्या नीलेश पाटणकर याने कॉनर पॉकेटसच्या चिंतामणी जाधव याचा 65-12, 46-45 असा सहज पराभव करून स्पर्धेच्या बाद फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला.
आजच्या अन्य सामन्यांत क्‍यू क्‍लबच्या अभिषेक बोरा याने पुण्याच्या रणजीत कचरे याचा 56-05, 52-21 असा सहज पराभव करून न गटातून स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. सांगलीच्या शुभम रोकडे याने स्पर्धेत यशस्वी सुरुवात करताना सलग दोन विजयांची नोंद केली. शुभम याने न्यू क्‍लबच्या येशू पिल्ले याचा 57-44, 05-39, 42-37 असा संघर्षपूर्ण पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात शुभमने पुण्याच्या अंकुश प्रसाद याचा 70-09, 59-01 असा सहज पराभव करून बाद फेरीकडे वाटचाल केली.

आणखी एका एकतर्फी सामन्यात पूना क्‍लबच्या विघ्नेश संघवीने क्‍यू क्‍लबच्या अविनाश वाघमारेचे आव्हान 64-21, 55-10 असे मोडून काढताना सहज आगेकूच केली. तसेच ठाण्याच्या सुशांत खाडे याने डेक्‍कन जिमखाना क्‍लबच्या संतोष धर्माधिकारी याचा 62-54, 57-21 असा पराभव करून विजयी सलामी दिली.

सविस्तर निकाल-

गटसाखळी फेरी – विघ्नेश संघवी (पूना क्‍लब) वि.वि. अविनाश वाघमारे(क्‍यू क्‍लब) 64-21, 55-10; वैभव बजाज (पुणे) वि.वि. सचित जामगांवकर (क्‍यू क्‍लब) 55-13, 57-25; संकेत मुथा (कॉनर्र पॉकेटस्‌) वि.वि. गिरीश गिरी (सांगली) 58-46, 27-57, 56-16; शुभम रोकडे (सांगली) वि.वि. येशू पिल्ले(न्यू क्‍लब) 57-44, 05-39, 42-37; पिनाकी बॅनर्जी (कोलकाता) वि.वि. करूण प्रदीप 52-10, 27-67, 57-24; नीलेश पाटणकर (ठाणे) वि.वि. नितीन पोतदार (पुणे) 54-58, 68-28, 62-48; विवेक एम. (पुणे) वि.वि. विपिन संकपाळ (पिंपरी-चिंचवड) 53-24, 58-14; रणजीत कचरे (पुणे) वि. वि. नितीन माने (पुणे) 72-21, 50-52, 56-40; निलेश पाटणकर (ठाणे) वि.वि. चिंतामणी जाधव (कॉर्नर पॉकेटस्‌) 65-12, 46-45; शुभम रोकडे (सांगली) वि.वि. अंकुश प्रसाद (पुणे) 70-09, 59-01; अभिषेक बोरा (क्‍यू क्‍लब) वि.वि. रणजीत कचरे (पुणे) 56-05, 52-21; सुशांत खाडे (ठाणे) वि.वि. संतोष धर्माधिकारी (डेक्‍कन जिमखाना) 62-54, 57-21; अमर राईकर (पुणे) वि.वि. अरुण बर्वे (पीवायसी) 60-30, 47-39; नितीन पी. वि.वि. अमरदीप जी. 52-38, 30-66, 69-39.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)