अखिल भारतीय खुली स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धा; रघुवंशी, शर्मा, पराशर यांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

पुणे  – द क्‍यु क्‍लब तर्फे आयोजित पहिल्या “स्टरलाईट टेक खुल्या स्नुकर अजिंक्‍यपद’ अखिल भारतीय खुल्या स्पर्धेत अनुज उप्पल, आनंद रघुवंशी, योगेश शर्मा, विग्नेश संघवी, योगेश शर्मा व अमित पराशर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

विमाननगर येथील क्‍यु क्‍लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत क्‍यु क्‍लबच्या अमित पराशर याने मानांकित खेळाडू व मुंबईच्या हसन बदामी याचा 52-39, 38-62, 10-63, 61-40, 54-46 असा संघर्षपूर्ण पराभव करून स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदविला. आणखी एका चुरशीच्या सामन्यात पुना क्‍लबच्या विग्नेश संघवी याने मुंबईच्या नीरज विसावा याचा 58-35, 56-20, 16-51, 45-52, 58-31 असा पराभव करून अंतिम 8 खेळाडूंमध्ये आपले स्थान पक्के केले.

दिल्लीच्या व मानांकित खेळाडू अनुज उप्पल याने आपली घौडदौड कायम ठेवताना शहाबाज खान याचा 87-61, 72-21, 70-12 असा सहज पराभव केला. क्‍यु मास्टर्सच्या आनंद रघुवंशी याने क्‍यु क्‍लबच्या अभिषेक बोरा याचा 57(52)-12, 50-07, 51-38 असा सहज पराभव केला. आपल्या विजयात आनंद याने 52 गुणांचा ब्रेकही नोंदविला. योगेश शर्मा याने सिध्देश मुळे याचा 77-28, 68-32, 69-36 असा सहज पराभव केला.

 स्पर्धेच्या उप-उपांत्यपुर्व फेरीचा निकालः

अनुज उप्पल (दिल्ली) वि.वि. शहाबाज खान (मुंबई) 87-61, 72-21, 70-12;
आनंद रघुवंशी (क्‍यु मास्टर्स) वि.वि. अभिषेक बोरा (क्‍यु क्‍लब) 57(52)-12, 50-07, 51-38;
योगेश शर्मा (कॉर्नर पॉकेटस्‌) वि.वि. सिध्देश मुळे (मुंबई) 77-28, 68-32, 69-36;
विग्नेश संघवी (पुना क्‍लब) वि.वि. नीरज विसावा (मुंबई) 58-35, 56-20, 16-51, 45-52, 58-31;
मोहम्मद खान (मुंबई) वि.वि. ज्ञानराजन सथपती (क्‍यु क्‍लब) 66-37, 72-43, 63-22;
राहूल सचदेव (मुंबई) वि.वि. धैर्य भंडारी (मुंबई) 50-38, 71-70, 101-40;
विजय निचानी (कोईमतूर) वि.वि. साबिर शेख (क्‍यु क्‍लब) 56-42, 78-43, 67-22;
अमित पराशर (क्‍यु क्‍लब) वि.वि. हसन बदामी (मुंबई) 52-39, 38-62, 10-63, 61-40, 54-46.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)