नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सरकारी बंगला सोडण्याचा आदेश दिल्यानंतर न्यायालयात धाव घेत दोन वर्षांसाठी तिथे राहण्याची परवानगी मागणाऱ्या माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मीडियाला आपल्यासाठी घर शोधून देण्याचे आव्हान दिले आहे. अखिलेश यादव यांच्यासोबत वडील मुलायम सिंह यादव यांनीदेखील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगला खाली करण्याचा आदेश दिला होता. अखिलेश आणि मुलायम सिंह यादव यांनी याचिका करत दोन वर्षांची मुदत वाढवून मागितली आहे.

अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात पार पडलेल्या पोटनिवडणुकीसंबंधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सरकारी बंगला सोडण्यासंबंधी विचारण्यात आलं. “आम्ही बंगला सोडण्यासाठी तयार आहोत, मात्र त्यासाठी वेळ पाहिजे. माझ्याकडे आणि नेताजींकडे (मुलायम सिंह) लखनऊत राहण्यासाठी कोणतेही घर नाही. जर तुम्ही शोधू शकत असाल तर आम्हाला सांगा”, असे अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. तुम्ही विषय भरकटवत आहात असंही अखिलेश यादव यावेळी बोलले.

आपल्या याचिकेत मुलायम सिंह यादव यांनी आपलं वय आणि तब्बेतीमुळे बंगला सोडण्यास वेळ मागितला आहे. अखिलेश यादव यांनी सुरक्षा आणि आपल्या मुलांच्या शिक्षणाचं कारण दिलं आहे. आपण माजी मुख्यमंत्री असताना बंगला का सोडावा असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)