…अखिलेश म्हणतात हा तर भाजपचाच कट

उत्तरप्रदेशातील बंगल्याचे मोडतोड प्रकरण
लखनौ – माजी मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादवी यांना मिळालेला सरकारी बंगला त्यांना सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर सोडावा लागला आहे. तथापी त्यांनी हा बंगला सोडताना त्यांच्या समर्थकांनी तेथे मोठी मोडतोड केली होती. त्यावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्‍वभूमीवर स्पष्टीकरण देताना अखिलेश यादव यांनी भाजपवरच आगपाखड केली आहे. त्यांनी म्हटले आहे की बंगल्याची मोडतोड करण्याचे कारस्थान आम्हाला बदनाम करण्यासाठी भाजपनेच केले आहे.

आज पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की पोटनिवडणुकांमध्ये सतत पराभव झाल्याने आम्हाला बदनाम करण्यासाठीच त्यांनी हा मोडतोडीचा कट रचला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान या बंगला तोडीच्या प्रकरणाबद्दल राज्यपाल राम नाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. हे करदात्यांच्या पैशातून उभारण्यात आलेल्या मालमत्त्तेच्या नुकसानीचे प्रकरण असून या प्रकरणी संबंधीतांवर कठोर कारवाई करावी अशी सूचना राज्यपालांनी सरकारला केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अखिलेश यांनी ही टीका केली.

सर्व माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे व्हिडीओ शुटींग करून ठेवा आणि त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची सर्व माहिती संकलीत करून त्याचा अहवाल सादर करा अशी सूचनाही राज्यपालांनी सरकारला केली आहे. हे नुकसान जाणिवपुर्वक झाले असेल तर त्याप्रकरणी संबंधीतांना नोटीसा जारी करा असेही सरकारी मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

अखिलेश यादव यांच्या समर्थकांनी या बंगल्याची जी प्रचंड मोडतोड केली आहे त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आली आहे. त्यावरून समाजवादी पक्षावर जनतेने क्षोभ प्रकट केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)