अखिलेश, मायावतींचा कर्नाटक दौरा म्हणजे राजकीय पर्यटन – भाजप

भाजपकडून खिल्ली: योगींच्या दौऱ्याचे मात्र जोरदार समर्थन
लखनौ – समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांचा कर्नाटकमधील प्रचार दौरा म्हणजे राजकीय पर्यटन असल्याची खिल्ली भाजपने उडवली आहे. त्याचवेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कर्नाटक दौऱ्याचे त्या पक्षाने जोरदार समर्थन केले आहे.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या राज्यातील प्रचारात अखिलेश, मायावती आणि योगी हे उत्तरप्रदेशातील नेते सहभागी होणार आहेत. हा धागा पकडून उत्तरप्रदेश भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी सप आणि बसपवर निशाणा साधला. सप आणि बसप हे दोन्ही पक्ष जातीय राजकारणावर फोफावले. त्यांचे मूळ असणाऱ्या उत्तरप्रदेशात त्यांची स्थिती खराब आहे.

कर्नाटकात त्यांना बिल्कूल जनाधार नाही. त्यामुळे अखिलेश आणि मायावती यांचा कर्नाटक दौरा फ्लॉप शो ठरेल, असा दावा त्यांनी केला. सप आणि बसप हे दोन्ही पक्ष कर्नाटकमधील काही जागा लढवत आहेत. दरम्यान, योगींना पाहण्यासाठी कर्नाटकची जनता आणि त्या राज्यातील भाजपचे कार्यकर्ते आतुर आहेत. विविध राज्यांमधील योगींच्या प्रचाराचा भाजपला लाभ होत आहे, असा दावाही त्रिपाठी यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)