पौड- चांदखेड (ता. मावळ) येथे पार पडलेल्या काळभैरवनाथ केसरी ही कुस्ती माळगाव येथील पै. अक्षय विठ्ठल मारणे याने जिंकून मानाची गदा मिळवली आहे. अक्षय हा माळेगाव (ता. मुळशी) येथील येथील प्रतगतशील शेतकरी बाळकृष्ण लक्ष्मण मारणे यांच्या नातू तर पुण्यातील पोलीस पै. राजेंद्र बाळकृष्ण मारणे यांचा पुतण्या आहे. दरम्यान, त्याचा सत्कार माळेगाव येथे अरुण गुंड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक राजेंद्र मारणे, नामदेव चौधरी, शिवाजी गुंड, सुखदेव चौधरी, गणपत गुंड, बंडोबा चोरघे, राजेंद्र गुळेकर, राजेंद्र मा. मारणे, संभाजी मारणे यांच्या सह गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच व मोठ्या संख्येने पैलवान मंडळी उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0