अक्षय कुमारला या एक्टरला पाहायचे आहे ‘राउडी राठोड’ च्या भूमिकेत

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवुडचा दिग्दर्शक करण जौहर ”कॉफी विद करण 6” या रिऍलिटी शोमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. करण बॉलिवूड मधील सिनेताऱ्यांना वैयक्तिक जीवनातील प्रश्न विचारून त्यांचे गुपित प्रेक्षकांपर्यंत या शोच्या माध्यमातून पोहचवितो. मागील काही दिवसांपूर्वी करणच्या शोमध्ये रणवीर सिंह आणि अक्षय कुमार यांनी एन्ट्री केली होती. यानंतर त्या एपिसोडचा प्रोमो रिलीज केला गेला. या प्रोमोला सोशल माध्यमांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शो दरम्यान करणने अक्षयला प्रश्न विचारला तुझा कुठल्या चित्रपटातील सीक्वलमध्ये रणवीरला बघशिल. या वेळी अक्षय कुमारने रणवीरबद्दल राउडी राठोड भूमिकेत बघायला आवडेल असे सांगितले. यावेळी रणवीरने आपल्या अंदाजात राउडी राठोडचा ‘आयकॉनिक’ डायलॉग ”डोंट एंग्री मी” बोलून दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)