अक्षय कुमारमुळे हृतिक रोशनच्या अडचणी वाढणार

पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये हृतिक रोशनचा “सुपर 30′ रिलीज होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मिळणाऱ्या सुटीचा फायदा या सिनेमाला मिळणार आहे. हटके रोल साकारणाऱ्या “सुपर 30’मधील हृतिक रोशनपुढे एक अडचणही असणार आहे. कारण अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित “2.0’देखील याच आठवड्यात रिलीज होण्याची शक्‍यता आहे.

आतापर्यंत अनेकवेळा हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून “2.0′ रिलीज करण्याचा निर्मात्यांचा बेत आहे. हे दोन्ही सिनेमे जर 25 जानेवारीच्या शुक्रवारी रिलीज झाले तर त्याचा परिणाम निश्‍चितच हृतिक रोशनच्या “सुपर 30′ वर होणार हे निश्‍चित आहे. यापूर्वीही हृतिक आणि अक्षय कुमारमध्ये टक्कर झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अक्षय कुमारचा “रुस्तुम’ आणि हृतिक रोशनचा “मोहोंजदडो’ एकाच दिवशी रिलीज झाले होते. परिणामी “रुस्तुम’ तुफान हिट झाला तर “मोहोंजदडो’ सपशेल फ्लॉप ठरला होता. आताही “2.0’चे रिलीज पुन्हा एकदा पुढे ढकलले जावे असे हृतिकला वाटणे स्वाभाविक आहे. 2017 मध्ये येणारा “2.0′ आता 2019 मध्ये येणार आणि हृतिकच्या अडचणी वाढवणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)