अक्षय कुमारने “हाऊसफुल्ल 4’चे शुटिंग थांबवले 

“मी टू’अभियानाचे पडसाद आता बॉलिवूडवर दिसायला लागले आहेत. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्यांबरोबर काम करायचे नाही, असे सांगून अक्षय कुमारने “हाऊसफुल्ल 4’चे शुटिंग थांबवले आहे. तशी विनंती त्याने निर्मात्यांना केली आहे. “हाऊसफुल्ल 4’चे डायरेक्‍शन साजिद खान करत आहे आणि त्यामध्ये नाना पाटेकरही असणार आहे. साजिद खानवर दोन महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तर नानाविरोधात तनुश्री दत्ताने केलेले आरोप तर दोन आठवड्यांपासून गाजत आहेत. अशा व्यक्‍तींबाबत काम करण्यासंदर्भ्गात “हाऊसफुल्ल 4’च्या निर्मात्यांनी आपली भूमिका निश्‍चित करावी, असे ट्‌विंकल खन्नाने म्हटले होते.
साजिद खान आणि नाना पाटेकर यांच्यावर असलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची सखोल चौकशी व्हायला हवी. तोपर्यंत सिनेमाचे शुटिंग थांबवण्यात यावे, असे अक्षयने म्हटले आहे. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईसाठी अशी कडक भूमिका घ्यायला हवी. गुन्हेगारांबरोबर मी काम करणार नाही. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, असे त्याने ट्विटरवरच्या संदेशात म्हटले आहे. “हाऊसफुल्ल 4’मध्ये रितेश देशमुख, बॉबी देओल, शरद केळकर, पूजा हेगडे, क्रिती खरबंदा आणि क्रिती सेनन असणार आहेत.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)