अक्षय कुमारने स्वीकारले वरुण धवनचे चॅलेंज पण…

वरुण धवन आणि अनुष्का शर्मा सध्या “सुई धागा: मेड इन इंडिया’च्च्यआ प्रमोशनसाठी नवनवीन युक्‍त्या वापरत आहेत. वरुण धवनने ट्‌विटरवरून एक चॅलेंज आपल्या मित्रमंडळींना दिले होते. सुईमध्ये 10 सेकंदात धागा ओवण्याचे हे चॅलेंज आहे. अक्षय कुमारने हे चॅलेंज स्वीकारले आणि धागा ओवण्याच्या आपल्या प्रयत्नांचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याने 10 सेकंदात सुईमध्ये धागा ओवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याला त्यामध्ये यश मिळू शकले नाही.

सरतेशेवटी त्याला पराभव मान्य करावा लागला आहे. आपल्या व्हिडीओला अक्षयने एक विनोदी कॅप्शनही दिली आहे. “जिसका काम उसीको बाजे, और करे तो डंका बाजे.’ असे अक्षयने म्हटले आहे.अक्षयने आता या चॅलेंजसाठी सचिन तेंडूलकरचे नाव नॉमिनेट केले आहे.

वरुण आणि अनुष्काचा “सुई धागा’ 28 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. हे दोघेही अतिसामान्य कुटुंबातील पती पत्नीच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आपल्या नवऱ्याच्या इभ्रतीसाठी धडपडणाऱ्या गृहिणीचा रोल अनुष्काने साकारला आहे. यातून गृहउद्योगाचा सामाजिक संदेशही दिला गेला आहे. आता वरुणचे चॅलेंज सचिन तेंडूलकर तरी पूर्ण करतो का, ते बघूया.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)