अक्षय कुमारच्या रुस्तुमच्या ड्रेससाठी लागली ‘एवढी’ बोली !

बॉलीवूडमधील चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या वेशभूषेसाठी केलेल्या कपड्यांचा लिलाव होत असतो. याआधीदेखील काही चित्रपटांमधील व्यक्तिरेखांच्या वेशभूषांचे लिलाव करण्यात आले आहे. बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमारने आपल्या वेशभूषेचा लिलाव जाहीर केला असून त्याला आतापर्यंत ५.२५ कोटींची बोली लावण्यात आली आहे. लिलाव २६ मेपर्यंत सुरू राहणार असून ही रक्कम आणखी वाढणार असल्याची चर्चा आहे.

अक्षय कुमारने ‘रुस्तम’ चित्रपटात नौदल अधिकाऱयाची भूमिका बजावली होती. या चित्रपटातील गणवेशाचा लिलाव अक्षय कुमार करत आहे. लिलावातील रक्कम प्राण्यांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगत अक्षय कुमारने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी व्यक्त केली आहे. अक्षय कुमारने एका ट्विटद्वारे गणवेशाच्या लिलावाबाबत माहिती दिली आहे. ‘रुस्तम’मध्ये परिधान केलेला नौदल अधिकाऱ्याच्या गणवेशाचा लिलाव करण्यात येत असून ही रक्कम प्राण्यांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती त्याने ट्विटद्वारे दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)