अक्षय कुमारची एसआयटीकडून कसून चौकशी 

दोन तासांत 42 प्रश्नांचा भडिमार 

चंदीगड: शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाचा अपमान आणि कोटकपुरा तसेच बेहबलकला गोळीबाराची चौकशी करणाऱ्या एसआयटीने आज बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची चंदीगडमध्ये चौकशी केली. एसआयटीने सुमारे दोन तासांच्या चौकशीत अक्षय कुमारवर 42 प्रश्नांचा भडिमार केला. गुरमीत राम रहीम आणि सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत बैठक, शिखांच्या धर्मग्रंथाच्या अपमानासह अनेक प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, अक्षय कुमारने एसआयटीचे हे आरोप फेटाळले आहेत.

-Ads-

या प्रकरणात कोटकपुरा पोलिसांनी माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल आणि अक्षय कुमार यांना समन्स जारी करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायमूर्ती रणजीत सिंह आयोगाच्या अहवालात अभिनेता अक्षय कुमारवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहे. या आरोपांनुसार अक्षयने 20 सप्टेंबर 2015 रोजी त्याच्या फ्लॅटवर तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल आणि डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम यांची बैठक घडवून आणली होती. या बैठकीतच गुरमीत राम रहीम याचा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते.

एसआयटीने दोन तासांच्या चौकशीत अक्षयला राम रहीम आणि सुखबीर बादल यांच्या बैठकीबाबत प्रश्न विचारले. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षयने सगळे आरोप फेटाळत, आपल्याला या प्रकरणात उगाचच ओढले जात असल्याचे म्हटले आहे. “माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. मला माहित नाही माझे नाव का घेतले जात आहे. मी शिखांच्या धर्मग्रंथाचा अपमान केलेला नाही, असे अक्षयने एसआयटीसमोर सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एसआयटीने अक्षयला आज (21 नोव्हेंबर) अमृतसरऐवजी चंदीगडमध्ये हजर राहण्याचा पर्याय दिला होता.

पंजाब पोलिसांच्या एसआयटीने याआधी अक्षयला 21 नोव्हेंबर रोजी अमृतसर सर्किट हाऊसमध्ये बोलावले होते. एसआयटीने अक्षयसह पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि शिरोमणी अकाली दलचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनाही बोलावले होते. एसआयटीने प्रकाश सिंह बादल आणि त्यांचे पुत्र सुखबीर सिंह बादल यांची सोमवारीच चंदीगडमध्ये चौकशी केली होती. “पंजाबच्या बाहेर अक्षयला कधीही भेटलो नाही, असे सुखबीर सिंह बादल यांनी चौकशीत एसआयटीला सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)