अक्षय ऊर्जा गुंतवणुकीत भारताने चीनला टाकले मागे

भारतातील अक्षय ऊर्जा निर्मितीत वेगाने होत आहे वाढ

नवी दिल्ली: जागतिक पातळीवर अक्षय ऊर्जेच्या निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या चीनच्या आजवरच्या वर्चस्वाला आता भारताने आव्हान दिले आहे. 2018च्या पूर्वार्धात भारताच्या स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रामधील गुंतवणूक गतवर्षीच्या तुलनेत 22 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. तसेच याच कालावधीमध्ये चीनमधील गुंतवणुकीत मात्र 15 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. ब्लुमबर्ग न्यू एनर्जी फायनान्सने (बीएनईएफ) प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालामध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. अक्षय ऊर्जा निर्मितीमधील भारताची ही प्रगती अशीच कायम राहिल्यास 2020 पर्यंत चीनला मागे टाकून भारत या बाजारपेठेवर आपले वर्चस्व निर्माण करील.

गेल्या काही वर्षांमध्ये स्वच्छ अक्षय ऊर्जा निर्मितीमध्ये भारताने अव्वल स्थानावर पोचण्यासाठी चांगली पावले उचलली आहेत. त्यामध्ये 2022 पर्यंत 1 लाख 75 हजार मेगावॅट अक्षय ऊर्जेच्या निर्मितीचे भारताचे लक्ष्य आहे. त्यामुळे भारताच्या अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रामधील गुंतवणुकीत सध्या झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी पारंपारिक पद्धतीने ऊर्जा निर्मिती करणाऱ्या स्त्रोतांपेक्षा अक्षय ऊर्जा निर्मितीच्या स्त्रोतांमध्ये भर पडली.

या वर्षीच्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये 1 हजार 541 मेगावॉट क्षमतेची वीजनिर्मिती झाली. गेल्या वर्षीच्या तिमाहीत हा आकडा 1 हजार 59 मेगावॉट एवढा होता. फीड इन टारिफवरून स्पर्धात्मक बोलीसाठीचा पवन ऊर्जा निर्मितीक्षेत्राचाही नजिकचा कठीण काळ आता मागे पडला आहे.

30 जून 2018 पर्यंत भारतामधील ग्रीड जोडणीद्वारे निर्माण झालेल्या अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये 71 हजार 325 मेगा वॉट ऊर्जेची निर्मिती करण्यात आली. पवन ऊर्जा प्रकल्पांद्वारे 34 हजार 293 मेगा वॉट तर सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे 23 हजार 23 मेगा वॉट एवढी वीजनिर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठीची यंत्रसामग्री जमीन आणि इमारतींच्या छतावर करण्यात आली आहे.

2017च्या आर्थिक वर्षांमध्ये भारताने सर्वाधिक म्हणजे 5 हजार 400 मेगावॅट एवढी पवन ऊर्जा निर्मिती केली. पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रामधील स्पर्धात्मक बोली, कमी वीजदर आणि जीएसटी असे मुद्दे असूनही भारताने अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी नोंदवली.

2018च्या पूर्वार्धामधील वीज निर्मितीच्या आकड्यांवरून भारताने या क्षेत्रासाठीच्या कठीण काळावर मात केली असून लवकरच या क्षेत्राची भरभराट होणार आहे. तसेच पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये 2020 या आर्थिक वर्षापासून केंद्र तसेच राज्य पातळीवर 10 हजार मेगावॅट-12 हजार मेगावॅट या क्षमतेमधील प्रकल्पांचा लीलाव होणार आहे.
सुझलॉन एनर्जीसारख्या नोंदणीकृत कंपनीला भारत तसेच भारताबाहेरील पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी स्पर्धा करण्यासाठी ही चांगली वेळ असून त्यात त्यांना लाभ होण्याची शक्‍यता आहे. सेंबकॉप्र इंडियासारखी कंपनीच्या संभाव्य आयपीओफमुळे भांडवली बाजारातही काही घडामोडींची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)