अक्षय अनभुले यांची विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्‍ती 

श्रीगोंदा – श्रीगोंदा येथील अक्षय सुनील अनभुले यांची विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. विद्यार्थी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍यराणा पाटील यांनी त्यांना नियुक्‍तीचे पत्र दिले. अक्षय अनभुले हे बी. ई. कॉम्प्युटर आहेत. विद्यार्थी चळवळीत ते नेहमी सक्रीय असतात. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अक्षय अनभुले यांच्या निवडीबद्दल विद्यार्थी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍य राणा पाटील, ऋषीकेश गायकवाड, हरिदास शिर्के, अख्तर शेख, प्रा. तुकाराम दरेकर, आमदार राहुल जगताप, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)