अक्षय्य तृतीयेनिमित्त ‘दगडूशेठ’ ला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे – अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. मंगलमूर्तीभोवती केलेली आंब्यांची आरास, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती आणि स्वराभिषेकातून गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. साडेतीनपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवाले यांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रातील जवानांना, कोंढवा येथील बालसंगोपन केंद्रातील मुले व वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना देण्यात येणार आहे, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)