अक्षय कुमार उर्फ खिलाडी कुमार याचा मुलगा ‘आरव’ याच्या १६व्या जन्मदिनाचे औचित्य साधून अक्षयने त्याचा आणि आरवचा फोटो ट्विट केला. आपल्या मुलाबद्दल प्रेम व्यक्त करताना तो एका पित्याप्रमाणे भावुक झाला.

या ट्विटमध्ये तो म्हणाला की, “माझ्यापेक्षा जास्त उंच, जास्त हुशार, जास्त श्रीमंत, जास्त चांगला ! या जन्मदिनावर तुला शुभेच्छा आणि तुला सदैव चांगल्या गोष्टी माझ्यापेक्षा जास्त मिळावे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आरव!”

अक्षयकुमारची पत्नी आणि आरवची आई ट्विन्कल खन्ना यांनी देखील आरवला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावर्षी त्याच्यासोबत नसल्याबद्दल देखील त्यांनी खेड व्यक्त केला. ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, “१५वर्षे सोबत जन्मदिवस साजरा केल्यावर यावर्षी सोबत नसल्यामुळे बिर्थ डे बॉय ला खूप मिस करत आहे.”

ट्विन्कल खन्ना यांनी त्यांचे तिसरे पुस्तक ‘पायजमाज आर फॉरगिविंग’ प्रकाशित केले आहे. त्यांचे अगोदरची पुस्तके ‘फनीबोन्स आणि द लिजेंड्स ऑफ लक्ष्मी प्रसाद’ ही दोन्ही पुस्तके ‘बेस्ट सेलर’ ठरली आहेत. अक्षयचा आगामी चित्रपट ‘२.०’ येतो आहे. त्यात सुपरस्टार रजनीकांत आहेत. त्याचबरोबर त्याच्या केसरी,हाउसफूल ४ आणि गुड न्युज या चित्रपटांचे चित्रीकरण सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)