अक्षयच्या चेष्ठेमुळे मौनी लागली रडायला

अक्षय कुमार आणि मौनी रॉय “गोल्ड’मध्ये एकत्र काम करत आहेत. मौनीने या सिनेमाच्या शुटिंगच्या दरम्यान झालेल्या चेष्टा मस्करीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ बघून हसून हसून पुरेवाट होईल. एका सिनेपत्रकाराशी मौनी फोनवरून बोलत असते.

“गोल्ड’मधील रोल आणि कथेबाबतची माहिती ती देत असते. त्याचवेळी कानाला फोन लावलेला अक्षय कुमारही तिच्या मागे येऊन उभा रहातो. मौनी सिनेपत्रकार समजून अक्षय कुमारशीच बोलत असते, हे तेंव्हा उघड होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मौनीला जेंव्हा ही गोष्ट समजते, तेंव्हा तिला रागही येतो आणि आपली फजिती झाली हे समजून चुकल्यामुळे रडायलाही येते. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या पब्लिकला ती डाफरायला लागते. पण हा अक्षयने केलेला निव्वळ विनोद आहे, हे सगळ्यांनाच माहिती असते. त्यामुळे तिच्या रागावण्याकडे कोणीच लक्ष देत नाही.

“गोल्ड’मध्ये अक्षय एका हॉकी प्लेअरच्या रोलमध्ये असणार आहे. इंग्लंडसाठी तो हॉकी खेळत असतो. मात्र त्याला आपल्या देशाच्यावतीने हॉकी खेळायची ईच्छा असते. त्याने आपल्या देशाच्या खेळाडूंना प्रशिक्षण दिल्यावरच भारताला मिळते हॉकीमधील पहिले “गोल्ड’ अशी ही कथा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)