अक्षयची “मुगल’मधून माघार, आता रणबीरला ऑफर

बॉलीवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमार याने “मुगल’ चित्रपटातून माघार घेतली आहे. हा चित्रपट गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची घोषणा धुमधड्याकात करण्यात आली. मात्र, चित्रपटाच्या स्क्रिप्टवरून अक्षय कुमार आणि निर्माता-दिग्दर्शक यांच्या एकमत न झाल्याने अक्षयने नकार दर्शविला. त्यानंतर रणबीर कपूरला ही ऑफर दिल्याचे समजते.

तसेच आमिर खानही चित्रपटात काम करण्याची शक्‍यता असल्याने चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. असे झाल्यास चित्रपट आणखीन दमदार होईल. दरम्यान, आमिर खान हा चित्रपटात को-प्रोड्यूसर म्हणून काम करत आहे. तो चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबतही काही सूचना करत आहे.

हा चित्रपट गुलशन कुमार यांच्यावर आधारित असल्याने त्यांची मुख्य भूमिका कोण साकारणार याकडे लक्ष वेधले आहे. ही भूमिका रणबीरने करावी, असे आमिर खानला वाटते. याबाबत रणबीरने अद्याप विचार करत असून होकार दर्शविला नाही.
दरम्यान, रणबीर कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला “संजू’ चित्रपट सूपरहिट ठरला होता.

या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची खूपच स्तुती करण्यात आली होती. तसेच या चित्रपटाने बॉक्‍स ऑफीसवर अनेक विक्रम स्थापित करत यश मिळविले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)