अक्षयकुमार फेब्रुवारी महिन्यात लोकप्रियतेत पहिल्या स्थानी

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार’पॅडमॅन’ चित्रपटामुळे फेब्रुवारी महिन्यात स्कोर ट्रेन्ड्‌स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता असल्याचे समोर आले आहे. ‘पद्मावत’ चित्रपटावेळी रणवीर सिंगने अक्षयला मागे टाकले होते. मात्र ‘पॅडमॅन’च्या रिलीजच्या महिन्यात लोकप्रियतेमध्ये अक्षय कुमार पहिल्या क्रमांकावर, अमिताभ बच्चन दुसऱ्या, सलमान खान तिसऱ्या आणि शाहरुख खान चौथ्या स्थानावर होते. तर रणवीर सिंग पाचव्या क्रमांकावर होता.

स्कोर ट्रेंड्‌सच्या प्रवक्‍त्याने ही नावे जाहीर केली आहेत. जानेवारी महिन्यात 57.67 गुणांसह तिस-या स्थानी असलेला अक्षय फेब्रुवारी महिन्यात 36.83 गुणांची आघाडी घेत, 94.50 गुणांसह अग्रस्थानी पोहोचला. अमेरिकेच्या ‘स्कोर ट्रेंड्‌स इंडिया’ या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)