अक्षयकुमारने ‘ट्विट’केले २.० च्या टिझर लॉन्चचे काउंट डाऊन

सुप्रसिद्ध दक्षिणात्य सिनेअभिनेता रजनीकांत व बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या २.० चित्रपटाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनामध्ये विलंब झाला आहे. आता चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारने २.० च्या टिझर रिलीज बाबत ट्विटर द्वारे ‘काउंट डाऊन’ सुरु केला आहे.

अक्षकुमारने २.० चित्रपटाच्या टिझर संदर्भात एक ट्विट केले असून त्यामध्ये “मनुष्य प्राण्यांनो सावध राहा, २.० येतोय” असे ट्विट केले आहे. २.० च्या टिझर लॉन्चला केवळ ५ दिवस उरले असून या महिन्याच्या १३ तारखेला टिझर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)