अक्कासाहेबांची लाडकी ‘सून’ ‘मराठी बिग बॉस’मध्ये ?

सध्या छोट्‌या पडद्यावरील ‘मराठी बिग बॉस’ची चर्चा  जोरात सुरू आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात नक्की कोणते सेलिब्रेटी पाहायला मिळणार, याकडे अनेकांचे डोळे लागले आहेत. उषा नाडकर्णी, पुष्कर जोग, राजेश शृंगारपुरे, रेशम टिपणीस या कलाकारांची नावे चर्चेत असतानाच आता छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जुई गडकरीच्या नावाचीही यात भर पडली आहे.

जुईने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यावरुन ती एका नव्या प्रवासाला सुरुवात करत असल्याचे संकेत मिळत आहेत. तिचा हा नवा प्रवास ‘बिग बॉस’ असू शकतो, अशी मीडियामध्ये चर्चा आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून जुई घरा-घराघरात पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)