अकोल्याच्या नगराध्यक्षपदी संगीता शेटे

उप नगराद्यक्षपदी बाळासाहेब वडजे बिनविरोध
अकोले – अकोले नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी संगीता अविनाश शेटे यांची तर उपनगराध्यक्षपदी बाळासाहेब वडजे यांची आज दुपारी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकाऱ्यानी केली.
आज उप नगराद्यक्षपदासाठी केवळ एकच अर्ज आल्याने व विरोधी गटाच्या भाजपाच्या नगर सेविका सोनाली नाईकवाडी यांनी आज निवड सभेस गैरहजेरी हजेरी लावल्याने ही उप नगराद्यक्षपदाची निवड बिनविरोध होण्यास साथ मिळाली. या निवड प्रक्रियेचे पीठासीन अधिकारी व प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांनी दोन्हीपदांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करताच शेटे व वडजे समर्थकांनी बाहेर रस्त्यावर फटाके फोडून व बाहेर गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला. शिवाय निवडणूक पार पडल्यावर अकोले गावातून सवाद्य मिरवणूक काढून आपल्या आनंदात इतर कार्यकर्त्यांना सहभागी करून घेतले.
माघारीच्या दिवशी निशीगंधा नाईकवाडी व सोनाली नाईकवाडी यांनी नगराद्यक्षपदाच्या साठी दाखल केलेले अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे शेटे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होणे बाकी होते. ती औपचारीकता डोईफोडे यांनी आज दुपारी विशेष बैठकीत पार पाडली.
त्यांना सहायक म्हणून नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ प्रवीण निकम यांनी सहकार्य केले. या दरम्यान आज सकाळी शासकीय विश्राम गृहावर उप नगराध्यक्षपदासाठी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी बाळासाहेब वडजे यांचे नाव जाहीर केले होते. त्यानुसार वडजे यांनी शेटे यांच्या निवडीची घोषणा झाल्यावर आपला अर्ज दाखल केला. सर्व पूर्तता झाल्यावर डोईफोडे यांनी वडजे यांच्या बिनविरोध निवडीचीही घोषणा केली. त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्याचा सत्कार प्रशासंनाकडून व नगरसेवकांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी डोईफोडे, निकम आदींचा सत्कार केला गेला. त्यांतर शासकीय विश्रामगृहावर सौ शेटे व श्री वडजे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सत्कार केला गेला.
यावेळेस माजी मंत्री मधुकर पिचड,जिल्हा बॅंकेचे अद्यक्ष सीताराम गायकर व मावळते अद्यक्ष के.डी.धुमाळ यांची भाषणे झाली. तर कैलास वाकचौरे, मधुकर नवले,परबत नाईकवाडी व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते.
त्यांतर गावातून शेटे व वडजे यांची सवाद्य मिरवणूक काढली. शिवाय गुलालाची उधळण व जोडीला फटाक्‍यांची आतिषबाजी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)