अकोले येथे शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र

कर्जमाफीचा गोंधळ : आमदार वैभव पिचड यांचा पुढाकार

अकोले – कर्जमाफीच्या कागदपत्रांची किचकट प्रक्रिया आहे, त्यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहू शकतात. हा प्रकार टाळण्यासाठी आमदार वैभव पिचड यांनी अकोले येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी अर्ज भरण्याचा मदत कक्ष सुरू केला आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस या आघाडी सरकारच्या काळामध्ये शेतकरी अडचणीत सापडल्यानंतर कोणत्याही प्रकारचे निकष न लावता सरसकट कर्जमाफी देण्यात आली. या कर्जमाफीमुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण होते. या योजनेचे तमाम शेतकऱ्यांनी स्वागत केले. परंतु, आता युती सरकारच्या काळामध्ये शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला. अनेक नैसर्गिक संकटांना तोंड देताना शेतकरी पुरता हवालदिल झाला. विरोधी पक्षांची संघर्षयात्रा, शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन यामुळे या युती सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. यामध्ये अनेक निकष लावले, म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचाच हा प्रकार आहे. या प्रक्रियेमुळे कर्जमाफीची अवघड व किचकट प्रक्रिया राबवीत असल्याने पुढील दोन वर्षे तरी कर्जमाफी मिळणे अवघड दिसत आहे. सदरची प्रक्रिया ऑनलाइन असून 14 प्रतिफॉर्म असल्याने अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणे शक्‍य वाटत नाही. कर्जमाफी अर्ज भरणे प्रक्रिया अनेक तांत्रिक अडचणींनादेखील शेतकऱ्यांना तोंड देण्याची वेळ येते.
अतिदुर्गम भागातदेखील मोठ्या प्रमाणात शेतकरी असताना या प्रक्रिया राबवायला कठीण जाते. यामुळे सदर परिस्थितीचा आढावा घेताना आमदार वैभव पिचड यांनी या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे अर्ज प्रत्येक शेतकऱ्यांकडून सुटसुटीत भरून घेण्याकरिता शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अकोले तालुक्‍यात आमदार संपर्क कार्यालयामध्ये कर्जमाफी अर्ज भरणे मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. तरी अकोले तालुक्‍यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही, या कर्जमाफीचा जास्तीत जास्त लाभ कसा होईल यासाठी आ. वैभव पिचड यांनी अकोले तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने ही सुविधा उपलब्ध केली आहे. या शेतकऱ्यांना गावामध्ये अर्ज भरता आले नाहीत, काही तांत्रिक अडचण आल्यास अशा शेतकऱ्यांनी आपले कर्जमाफीचे अर्ज कार्यालयामध्ये येऊन भरावे, असे आवाहन आमदारांनी तमाम शेतकऱ्यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)