अकोले येथे वीज कामगार संघटनेची निदर्शने

अकोले: येथे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी अकोले उपविभागीय कार्यालयावर आज (दि.7) निदर्शने करण्यात आली.

महापारेशन कंपनीतील स्टाफ सेटअप लागू करीत असताना आधीचे एकूण मंजूर पदे कमी न करता आहे तोच अंमलात आणावा, महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचविलेल्या सूचनांचा अंतर्भाव करूनच अंमलात आणावे, शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीने राबविण्यात येत असलेले खाजगीकरण धोरण थांबवावे, मुंब्रा, शिळा, कळवा व मालेगावचे विभाग फ्रॅंचायशीवर खाजगी भांडवलदार देण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी, कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लघु जलविद्युत निर्मित संचाने शासनाने अधिग्रहित न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत ठेवावे. महानिर्मिती कंपनीच्या 210 मेगावॅटचे संच बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे आदी मागण्यांसाठी हे एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून मागण्या मान्य करण्याची मागणी केली. या आंदोलनाची सुरुवात संघटनेच्या फलकाला पुष्पहार घालून करण्यात आली. या आंदोलनात पी. व्ही. ताजणे, श्रीराम वाकचौरे, लक्ष्मण गोडे, वैभव देशमुख, संदीप नाईकवाडी, पांडुरंग जऱ्हाड, नंदू भांगरे, अरुण कराळे, शिवदास देशमुख, मदन अत्रे, सुरेश नाडेकर, राहुल साबळे, जेजीराम गावित, प्रवीण देशमुख, विक्रम वाकचौरे, आत्माराम कोळसे, शिवाजी आंबरे, खंडू सारोक्ते आदी सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)