अकोले धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर मंदावला

अकोले – अकोले तालुक्‍यात गेल्या 24 तासांत पावसाचा जोर मंदावल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम भंडारदरा धरणातील व पिंपळगाव खांड धरणातील आवक मंदावली. तालुक्‍यातील पूर्व भागात तर पूर्णपणे उघडीप राहिल्याने शेती कामे उरकण्याची शेतकरी वर्गाची लगबग सुरू आहे.
भंडारदरा धरणातील पाण्याची आवक 181 दलघफू इतकी खाली आली, तर पिंपळगाव खांड धरणाच्या सांडव्याचा विसर्गही 3 हजार क्‍युसेकवरून 2 हजार 500 वर खाली आला. यावरून पावसाचा जोर किती ओसरला आहे हे चित्र स्पष्ट होण्यास मदत होते. भंडारदरा धरणात सकाळी 3 हजार 797, निळवंडे धरणात 663, मुळा धरणात 4 हजार 739 व आढळा धरणात 174 दलघफू पाणीसाठे शिलकी होते. तर, भंडारदरा धरणातून 802 क्‍युसेकने निळवंडे धरणात व निळवंडे धरणातून 900 क्‍युसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडला जात आहे.
गेल्या 24 तासांत पावसाची झालेली नोंद मिलीमीटरमध्ये : भंडारदरा-37, वाकी-26, पांजरे-42, रतनवाडी-47, घाटघर-31 व कोतूळ 01. पूर्व भागात मशागतीच्या कामांना वेग आला आहे. नांगरणी, काटे वेचणी व अन्य कामे सुरू असल्याचे शेतकरी कारभारी बंदावणे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)