अकोले तालुक्‍यात स्वाईन फ्लूचा पाचवा बळी

अकोले – अकोले तालुक्‍यात स्वाईन फ्लूचा फैलाव झपाट्याने वाढत असून यात दगावलेल्यांची संख्या 5 झाली आहे. आज धुमाळवाडी येथील विवाहितेचा व 4 दिवसांपूर्वी इंदोरी येथील विवाहितेचा मृत्यू सर्व महिलांना धास्तावणारा ठरला आहे.
एक विवाहिता अकोले व नंतर नाशिक येथे उपचार घेत होती. तिचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या 5 झाली आहे. शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. इंदोरी येथे ही महिला होती. तांभोळ (ता.अकोले)येथील युवकाचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाला होता. त्यापूर्वी समशेरपूरमध्ये एकाचे स्वाईन फ्लूने निधन झाले होते. मोग्रसमध्ये 51 वर्षांच्या महिलेचा स्वाइन फ्लूने घास घेतला आहे. तर लिंगदेवमध्ये एकाचे पुण्यात उपचारदरम्यान स्वाईन फ्लूने निधन झाले.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान तालुकाआरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे यांच्याशी संपर्क साधला असता नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तातडीने रुग्णाला दवाखान्यात दाखल करावे असे त्यांचे म्हणणे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)