अकोले तालुक्‍यातील कावडी शिखर शिंगणापूरला रवाना

अकोले- शिखर शिंगणापूर (सातारा) येथील महादेव यात्रेसाठी तालुक्‍यातील कावडी प्रवरा नदीचे पाणी घेऊन रवाना झाल्या. तालुक्‍यातील कळस, परखतपूर, औरंगपूर, कुंभेफळ, घोडसरवाडी व संगमनेर तालुक्‍यातील धांदरफळ येथील भाविक कावडी घेऊन रवाना झाले. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील महादेव हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ही यात्रा गुढीपाडवा सणापासून सुरू होते.

दररोज 60-70 किलोमीटर प्रवास करून 400 किलोमीटर अंतराचा प्रवास सहा-सात दिवसांत मजल दरमजल करीत भाविक पूर्ण करतात. दोन दिवस शिखर शिंगणापूर येथे मुक्कामी राहतात व त्यानंतर गावी महादेवाचा यात्रा उत्सव होतो. परखतपूरचे मारुती वाकचौरे हे नव्वदी गाठलेले भाविक 65 वर्षांपासून शंभू महादेवाच्या ओढीने पायी शिखर शिंगणापूरला जातात.

देवराम वाकचौरे म्हणाले, “”मला माझ्या वस्तीवरून गावात पायी यायचे म्हणजे दम लागतो, पण ही वारी शंभू महादेवाच्या कृपेने चालत पूर्ण करतो.” या कावडीचे नियोजन मारुती वाकचौरे, सत्यवान वाकचौरे, सुधाकर वाकचौरे, प्रकाश वाकचौरे, उत्तम वाकचौरे, रवी कोटकर, युवराज भोर, दिलीप वाकचौरे, चंद्रकांत वाकचौरे, अशोक वाकचौरे, शिवाजी वाकचौरे करतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)