अकोले तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

अकोले – मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने स्व. अनंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार नाशिक विभागातून अकोले तालुका पत्रकार संघाला सिक्कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पाटण, ता. कराड, जिल्हा सातारा येथे हा शानदार सोहळा पार पडला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन पत्रकार संघाचा गौरव करण्यात आला. गेल्या 25 वर्षात अकोले तालुका पत्रकार संघाने आदिवासी व वंचितांच्या प्रश्‍नी आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. तालुक्‍याच्या विकासात पत्रकार संघाने सकारात्मक भूमिका बजावली. या कार्याचा गौरव म्हणून मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने हा पुरस्कार पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय पोखरकर, सचिव विद्याचंद्र सातपुते, उपाध्यक्ष प्रा. मच्छिंद्र देशमुख, माजी अध्यक्ष प्रकाश आरोटे, हेमंत आवारी, अमोल वैद्य यांनी स्वीकारला.
यावेळी माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर, पाटणचे आमदार शंभूराजे देसाई, मनसेचे राज्य सरचिटणीस संदीप देशपांडे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)