अकोले-गणोरे रस्त्यावर खड्डे

तळ्याचे स्वरूप; प्रवाशांचे हाल

गणोरे – अकोले-गणोरे-संगमनेर या डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी मोठ्या आकारातील खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने तळ्याचे स्वरूप आले आहे. वीरगाव फाटा ते जवळे कडलग हद्दीपर्यंत प्रवाशांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.

रस्त्याच्या कडाही खचून ठिकठिकाणी वाहनांसाठी अपघाती जागा तयार झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायतीने अनेकदा मागणी केली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याची भावना लोकांमध्ये आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)