अकोलेनगरपंचायतीला हागणदारीमुक्‍त पुरस्कार जाहीर

अकोले- येथील नगरपंचायतीला हागणदारीमुक्‍त पुरस्कार जाहीर झाला. नगराध्यक्ष के. डी. धुमाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी ही माहिती दिली. या पुरस्कारामुळे नगरपंचायतीला 1 कोटी रुपयांचा विकास निधी मिळणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

उघड्यावर शौचाला जनतेने जाऊ नये म्हणून सर्व स्तरावर जनतेचे प्रबोधन केले गेले. शिवाय वैयक्‍तिक लाभाची 634 शौचालये बांधली गेली. त्यातील 628 शौचालये ही ऑन लाईन नोंदली गेली. यातील 50 टक्के लाभार्थींना निधी दिला गेला. 70 लाख 72 हजार रुपयांचा निधी खर्चझाल्याचेमुख्याधिकारी डॉ. निकम म्हणाले.

गुड मॉर्निंग पथके तयार केल्याचेही सांगण्यात आले. स्वच्छता पाहणीसाठी जिल्हास्तरीय समितीने 28 जूनला, राज्यस्तरीय कमिटीने 6 जुलैला व केंद्रीय समितीने 3 ऑगस्टला पाहणी केली होती. यासाठी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मार्गदर्शकाचेकार्य केले. पत्रकार परिषदेला नगरसेवक बाळासाहेब वडजे, सुरेश लोखंडे, निशिगंधा नाईकवाडी, पुष्पा शेटे, विमल भोईर, किर्ती गायकवाड, सचिन शेटे, प्रमोद मंडलिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)