अकोलेत कांद्याला 2 हजार रुपये भाव

दोन नंबर कांद्याची दीड हजारात विक्री
बाजारात 2 हजार 340 गोण्यांची आवक

अकोले – येथील बाजार समितीत सोमवारी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 2 हजार 75 रुपये भाव मिळाला.
एकूण 2 हजार 340 कांदा गोण्यांची आवक झाली. मागील लिलावाशी तुलना करता बाजारभावात वाढ झाली आहे. बाळाजी पुंडे यांनी आणलेल्या कांद्याला 2 हजार 51 रुपये, सुखदेव पुंडे यांच्या कांद्याला 2 हजार रुपये, अशोक चासकर यांच्या मालाला 2 हजार 75 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला आहे. बाजारभाव चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नंबर दोनच्या कांद्याला 1 हजार 501 ते 1 हजार 900 रुपये, नंबर तीनच्या कांद्याला 801 ते 1 हजार 700 रुपये, तर जोडकांदा मालाला 300 ते 700 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)