अकोला शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही

अकोला – अकोला शहराच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे, त्यातून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, यापुढेही विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही  पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.

अकोला महानगर पालिका हददीतील मुलभूत सोयी, सुविधे अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, क्राँक्रीटीकरण व नाला बांधकामासह सुधारणाबाबतच्या कामांचे भूमीपूजन आज पालकमंत्री यांच्या हस्ते झाले, या निमित्त सिंधी कॅम्प परिसरातील हिराबाई प्लॉट वाकींग ट्रॅक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सिंधी कॅम्प परिसरातील विविध विकास कामांचे भूमीपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक हरीषभाई अलीमचंदानी, महानगर पालिकेचे आयुक्त जीतेंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेष चव्हाण, आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)