अकार्यक्षम 18 सार्वजनिक ग्रंथालये बंद

पुणे – जिल्हा ग्रंथालयाच्या तपासणी पथकाच्या तपासणीत दोषी आढळलेल्या 18 शासनमान्य अकार्यक्षम सार्वजनिक ग्रंथालये बंद करण्याची कारवाई शासनाकडून करण्यात आलेली आहे.

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना शासनाकडून दर्जानुसार अनुदान देण्यात येते. काही ग्रंथालये अनुदान घेतात व प्रत्यक्षात व्यवस्थीत कारभारच करत नसल्याचे उघडकीस येते. अनुदानाचा वापर ग्रंथालयाच्या विकासासाठी करण्याबाबत शासनाने नियमावली आखून दिलेली आहे. मात्र, शासनाच्या नियमावलीची अंमलबजावणी न करणाऱ्या ग्रंथालयावर शासनाच्या जिल्हा ग्रंथालय कार्यालयाकडून कारवाई करण्यात येते. सलग तीन वर्ष लेखा परीक्षण अहवाल सादर न करणे, वार्षिक अहवाल सादर न करणे, ग्रंथालय सतत बंद असणे, आवश्‍यक सुविधांचा अभाव, ग्रंथालयात कर्मचारीच उपलब्ध नसणे, पुरेशी पुस्तके उपलब्ध नसणे, अशा विविध कारणांमुळे शासनाकडून ग्रंथालयांवर नियमित कारवाई करण्यात येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निरीक्षकांमार्फत ग्रंथालयांची नियमित तपासणी केली जाते. या तपासणीत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 18 ग्रंथालये दोषी आढळली आहेत. या ग्रंथालयांना अकार्यक्षम ठरविण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्हा, तालुकास्तर वगळता इतर स्तरातील “अ’ वर्गातील एक, “ब’ वर्गातील एक, “क’ वर्गातील सहा, “ड’ वर्गातील दहा ग्रंथालयाच्या कामकाजात अनियमितता असल्याचे आढळून आले आहे. यात ग्रामपंचायतीच्या तीन ग्रंथालयांचाही समावेश आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)