अकलूज येथे 105 फुट उंचीवर फडकला तिरंगा

 ग्रामपंचायत पातळीवरील देशातील पहिला सर्वात उंच ध्वजस्तंभ

अकलूज – ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवरील देशात सर्वात उंच ध्वजस्तंभावर भव्य तिरंगा अकलूज येथे फडकविण्यात आला. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
अकलूज परिसरात राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागावी, नव्या पिढीला तो प्रेरणादायी ठरावा या उद्देशाने खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या खासदार निधीतून सुमारे 20 लाख रुपये खर्चून या 105 फुट उंच राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात आली आहे.

-Ads-

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभावर तीस फुट लांबी व वीस फुट रुंद असणारा तिरंगा ध्वज आहे. याचे व्यवस्थापन अकलूज ग्रामपंचात करणार आहे. ध्वजारोहण कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आर.एस.पी, बालवीर, गाईड,घोषवाक्‍य पथकाने सलामी व मानवंदना दिली.

या वेळी नंदिनीदेवी मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, जि.प.सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील, जि.प. सदस्या कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील, पं.स.सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माळशिरस तालुका पं.स.सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोरसिंह सुळ-पाटील,

अकलूजचे उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलिस उपाधिक्षक मंगेश चव्हाण, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, गट शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी महालिंग नकाते आदी मान्यवरांसह जिल्हा परिषद शाळेतील सुमारे 750 विद्यार्थी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)