अकलूज येथे सोमवारपासून लेदरबॉल लिग क्रिकेट स्पर्धा

गोवा, मुंबई, पुणे, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातील संघांचा समावेश

अकलूज – सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अकलूज येथे महर्षि जिमखाना व स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने 1 जानेवारी 2018पासून महर्षि चषक लेदरबॉल लिग क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत पुणे, मुंबई, गोवा, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातील संघांमध्ये विजेतपदासाठी चुरशीचे सामने रंगणार आहे, अशी माहिती जिमखान्याचे अध्यक्ष सत्यशिल मोहिते-पाटील यांनी दिली. शंकरनगर येथील महर्षी प्रशाला व माळेवाडी-अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर सोमवार, दि. 1 जानेवारीपासून दोन सत्रात खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. हे सामने 20 षटकांचे असून जिल्हा असोसिएशन पंचांच्या उपस्थितीत खेळवण्यात येणार आहेत.

महर्षि जिमखान्याच्या वतीने प्रत्येक संघाला स्पोर्टस किट, भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास 51 हजार रूपये, तर उपविजेत्या संघास 25 हजार रूपयांचे रोख बक्षिस देण्यात येणार आहे. लेदर बॉलवरील टी-20चे सामने पाहण्याची संधी अकलूज व परिसरातील क्रीडाप्रेमींना उपलब्ध झाली असून क्रिकेट रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सत्यशील मोहिते-पाटील यांनी केले आहे. या स्पर्धेचे उद्‌घाटन डीवायएसपी मंगेश चव्हाण यांच्या हस्ते महर्षी प्रशाला, शंकरनगर येथे होणार आहे. या स्पर्धेतील उद्‌घाटनाचा सामना पुणे पोलीस विरुद्ध वेळापूर यांच्यात होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)