अकलूज येथे बुधवारपासून राज्यस्तरीय लेझीम स्पर्धा

अकलूज- संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ यांचे संयुक्‍त विद्यमाने सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेअसल्याचे मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 12 वर्षांपासून राज्यस्तरीय लेझीम स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने या स्पर्धेला एक वेगळाच रंग चढला आहे. बुधवार (दि. 3) ते शुक्रवार (दि. 5) या कालावधीत या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धा शालेय शहरी व ग्रामीण मुले गट, शालेय शहरी व ग्रामीण मुली गट व प्राथमिक गट अशा तीन गटांमध्ये होणार आहेत.

शालेय शहरी व ग्रामीण मुले व मुलींच्या गटातील विजेत्यांना रोख रकमेसह स्मृती चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सर्व गटांमधून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या मुलांच्या व मुलींच्या संघास प्रत्येकी 25 हजार रूपयांचे विशेष पारितोषिकही देण्यात येणार आहे. त्याशिवाय उत्कृष्ट लेझीम प्रशिक्षकास 1 हजार 501 व स्मृतीचिन्ह, उत्कृष्ट हलगी वादकास 1 हजार 1 रूपये व स्मृतीचिन्ह, उत्कृष्ट घुमके वादकास 1 हजार 1 रूपये व स्मृतीचिन्ह आणि उत्कृष्ट सनई वादकास 1 हजार 1 रूपये व स्मृतीचिन्ह अशीही बक्षिसे देण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)