अकलूजमध्ये साकारतोय “रयतेचा राजा, राजा शिवछत्रपती’

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने महानाट्य

अकलूज, दि.10 (प्रतिनिधी)- सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्त्वांच्या अकरा प्रसंगावर “रयतेचा राजा, राजा शिवछत्रपती ‘हे भव्य दिव्य महानाट्य साकारत आहे. सुमारे 950 पेक्षा अधिक कलाकारांचा सहभाग आणि किल्ल्यांची प्रतिकृती असलेला भव्य रंगमंच असून, 15 आणि 16 जानेवारीला अकलूजच्या स्टेडियमवर या महानाट्याचे प्रयोग होणार असल्याची माहिती कार्यक्रमाच्या सहव्यवस्थापिका व जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता जोपासणारे व भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्याचा हातखंडा असणारे जयंती समारंभ समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून या महानाट्याची निर्मिती होत आहे.
सहकार महर्षी शंकराव मोहिते-पाटील यांची 101 वी जयंती, कर्मवीर बाबासाहेब माने-पाटील यांची 50 वी पुण्यतिथी आणि खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे अमृत महोत्सवी वर्ष याचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 15 व 16 जानेवारीला अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील स्टेडियमवर या महानाट्याचे दोन प्रयोग होणार आहेत. यावेळी प्रत्येक प्रयोगात सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक प्रेक्षक उपस्थित राहतील, असा अंदाज जयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला आहे. या महानाट्यासाठी 50 बाय 110 फुट आकाराचे भव्य स्टेज आणि यात छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा, पावनखिंड, सिंहगड यांच्या प्रतिकृती उभ्या करण्यात आल्या आहेत.
या महानाट्यात स्वराज्यरक्षक “संभाजी महाराज’ या मालिकेतील छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणारे शंतनु मोघे हे महाराजांच्या भूमिकेत, तर पुतळाराणींच्या भूमिकेत पल्लवी वैद्य आहेत. अफजल खानाची भूमिका शैलेश पितांबरे साकारणार असून, निराजी रावजी यांची भूमिका रवींद्र कुलकर्णी साकारणार आहेत. याबरोबरच अकलूज आणि परिसरातील सुमारे 950 पेक्षा जास्त कलाकार आहे. त्याशिवाय घोडे-हत्ती यांचाही समावेश यामध्ये असणार आहे. यासाठी जयसिंह मोहिते-पाटील हे स्वतः प्रशिक्षण देत आहेत.

  • छत्रपती शिवरायांच्या सहकाऱ्यांच्या बलिदानावर आधारित 11 घटना…
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू, संभाजी जाधव, शिवा काशीद यांसह स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या 11 सहकाऱ्यांच्या शौर्याच्या घटना दिसणार आहेत. खीलजी आक्रमण, शिवजन्म राज्याचा पाटील, अफजलखान वध, पन्हाळा वेढा आणि शिवराज्याभिषेक या ऐतिहासिक घटनांचे दर्शन प्रेक्षकांना होणार आहे. त्याशिवाय पोवाडे, गोंधळ गीत, विविध गाणी आणि लढाईच्या दृश्‍यांचाही अंतर्भाव आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)