अकलूजमध्ये घोड्यांच्या जत्रा बाजारचे उद्‌घाटन उत्साहात

अकलूज- अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने विविध शेतमालाच्या बाजारसाठी प्रशस्त पत्राशेड उपलब्ध करून दिलेआहे. त्यामुळे उन, वारा, पाऊस यापासून कांदा सुरक्षित राहणार आहे. शेतमालाची नासाडी होणार नाही. या मार्केटमध्ये हायमास्ट लॅम्पद्वारे लाईट व्यवस्था उपलब्ध आहे, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, शौचालय इत्यादी आवश्‍यकसोयीसुविधा बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत, असे प्रतिपादनअकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
दिवाळीच्या पाडव्याच्या मुहुर्तावर येथील घोडे यात्रेचे उद्‌घाटन माळशिरस तालुक्‍याचे नेते जयसिंह मोहिते पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले, यावेळी मदनसिंह मोहिते-पाटील बोलत होते. अकलूजचा घोडे बाजार गेल्या दहा वर्षांपासून भरविण्यात येत असून हा बाजार सुमारे दीड ते दोन महिने चालतो. या बाजारमध्ये देशभरातील व्यापारी घोडे खरेदी-विक्रीसाठी येतात. जातिवंत घोड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या बाजारमध्ये आठ ते दहा कोटींची उलाढाल होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)