अकलूजमधील विकासकामांचे भूमिपूजन

अकलूज – अकलूज ग्रामपंचायतीच्या विविध योजनेअंतर्गत सुमारे 26 लाख रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या विकासकामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद पक्षनेते धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या शितलदेवी मोहिते पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप, स्वाती जगताप, आदित्य आरवे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी कदम, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद सेस फंड योजनेतून पंचवटी येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 6 लाख, नागरी सुविधा योजनेअंतर्गत जयशंकर नगर येथील रस्ते डांबरीकरणासाठी 10 लाख, दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत समता नगर येथील रास्ता कॉंक्रिटचा करण्यासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)