अकलुज परिसरात वडाच्या 100 झाडांचे रोपण

अकलूज – शिवरत्न फाऊंडेशन व डॉटर्स मॉम फाऊंडेशनने वटसावित्री पोर्णिमेचे औचित्य साधून वडाची शंभर झाडे लावुन एक आगळी वेगळी नाविण्यपूर्ण वटपोर्णिमा साजरी केली.

डॉटर्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या वडाची फांदी तोडून पूजा करण्या एवजी चला एक वडाचे झाड लावू, या कल्पक विचारातून ही संकल्पना साकारण्यात आली. वडाचे झाड हे पर्जन्यवृष्टीसाठी निसर्गास मदत करते व वडाच्या झाडांमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्‍सिजनची निर्मिती होते तसेच प्रदुषण कमी करण्यास मदत होते. यामुळे हे झाड वटपोर्णिमे दिवशी वृक्षारोपणासाठी निवडण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अकलूज मधील सहकारनगर, मसूदमळा, बायपास रोड या ठिकाणी शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील, शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील, डॉटर्स मॉम फाऊंडेशनच्या सर्व महिला सदस्या तसेच अकलूज ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांचे हस्ते 100 वडांच्या झाडांची लागवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)