अकलुजच्या शॉर्ट फिल्म फेस्टीव्हल मध्ये इराणची नॉट एट प्रथम

अकलुज- स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीव्हल मध्ये इराणच्या नॉट एट फिल्मला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर जर्मनीच्या वेरी फिल्मने द्वितीय आणि जर्मनीच्याच इन्स्फर या शॉर्ट फिल्मने तृतीय नंबर मिळविला. जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील यांचे हस्ते विजेत्या निर्मात्यांना अनुक्रमे एक लाख, 51 हजार व 21 हजार रुपयांची पारितोषीके देण्यात आली.
स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जंयती निमित्तने तीन दिवसीय शॉर्ट फिल्म फेस्टीव्हल आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जगभरातील 428 शॉर्ट फिल्म सहभागी झाल्या होत्या. अकलुज येथील स्मृती भवन मध्ये नुकताच बक्षीस वितरण समारोह संपन्न झाला. यावेळी माजी आमदार राजन पाटील, फत्तेसिंह माने पाटील, पदमजादेवी मोहिते पाटील, युवराज अभंगराव, भागिरथ भालके, दादा साठे, वैभव मोरे, गणेश पाटील, वैभवराजे जगताप, आदिनाथ रुपनवर, शेखर गाडे, अजित तळेकर, उर्वशीराजे मोहिते पाटील, सिमा पाटील, दीपक आंदळकर, राजेंद्र पाटील, जगदीश भोसले, आरती भोसले, मेनका फाळके, मानसिंग भोसले, मनिष कोरे, दिग्दर्शक मिलिद दास्तानी, जयराज माने पाटील उपस्थित होते.
फेस्टीव्हल मध्ये तामिळनाडूच्या पिझम पोर चितीरामे या शॉर्ट फिल्मला विभागून दुसरा क्रामांक मिळाला तर उत्कृष्ट दिग्दर्शक अरिसन वजीर, अभिनेता स्टिफन मेगोटेट, अभिनेञी नयना रणदिवे व गब्रेत्ता सेल्युस, बाल कलाकार सरताज कफकरक, हॉंलिमा कॅमेरा क्‍लॉंनडे, अँनडियेडे एडिटींग क्‍लॅंनडे अँनडियेडे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली. यावेळी अजय तपकिरे, अंकुश आतकर, युसुबभाई मोहोळकर, सरला नांदोरेकर, श्रीकांत देवडीकर, अशोक पाटोळे, रियाज चौधरी, विक्रांत शिंदे, प्रशांत महामुनी ,अतिश पाटोळे, नाजनीन शेख, इम्तीयाज मात्तेदार, अमोल माने, श्‍याम सावजी, संदीप सोनवणे, अभिजीत केंगार, भामाबाई गायकवाड, विठ्ठल सांळुखे, मोहन मोरे यांना कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. आभार धवलसिंह मोहिते-पाटील व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)