अकलुजच्या ग्रीनफिंगर्स स्कूल मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी पदग्रहण सोहळा

अकलुज- शंकरनगर येथील द ग्रीनफिंगर्स स्कूल मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचा पदग्रहण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेचे प्राचार्य जॉर्ज पी. एस व प्रशासकीय अधिकारी जयकुमारन सी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य जॉर्ज म्हणाले कि, शाळेमधील या सर्व विद्यार्थ्यांमधून तुम्हाला शाळेचे प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. तुमच्याकडे असणारे नेतृत्वगुण, शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तप्रियता, खेळामधील नैपुण्य या गुणाच्या आधारे तुमची निवड करण्यात आली आहे. तरी आपल्या कौशल्याच्या आधारे नेतृत्वगुण दाखवून आपली निवड योग्यता कशी आहे हे दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे.
शैक्षणिक वर्ष 2018-19 या वर्षाकरिता स्कूल कॅप्टन म्हणून अनुष्का पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून योगेश खिलारी, समर्थ बेडगे, अमर खराडे, रोहन शिंगण तसेच शैक्षणिक विद्यार्थी प्रतिनिधी प्राजल रुपनवर व क्रीडा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विनायक कर्णवर यांनी पदग्रहण केले. नवीन स्कूल कॅप्टन आणि विद्यार्थी प्रतिनिधीचे अभिनंदन शाळेचे कार्यकारी अध्यक्ष माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, वरिष्ठ विश्वस्त सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, चेअरमन नितीन इंगवले यांनी केले. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)