अकरा वर्षांपूर्वीच्या अपघात प्रकरणातून पीएमपीएल चालकाची निर्दोष मुक्तता

पुणे- अकरा वर्षांपूर्वी झालेल्या अपघात प्रकरणात पीएमपीएल चालकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली शिक्षा सत्र न्यायालयाने रद्द केली. चालकाची निर्दोष मुक्तता केली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही.एस.कुलकर्णी यांनी हा आदेश दिला आहे.
दादाभाऊ नाना हरगुडे असे त्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. अशोक संकपाळ, ऍड. मंदार संकपाळ, ऍड. सचिन कुंभार आणि ऍड. अभिषेक बाफना यांनी काम पाहिले. अपघाताची घटना 2 सप्टेंबर 2007 रोजी रात्री 10 वाजता लोणीकंद
गावच्या हद्दीत घडली. हरगुडे हा पीएमपीएल बस घेऊन तळेगाव ढमढेरेकडे चालला होता. त्यावेळी उतार उतरत असताना रस्त्याच्या कडेला उभारलेल्या डंपरला पीएमपीची पाठीमागून धडक बसली. त्या झालेल्या अपघातात तीघांचा मृत्यू झाला. तर आठरा जण जखमी झाले होते. पीएमपीएलचे ही मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हरगुडे याला 1 वर्षे सक्तमजुरी आणि 1400 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निकालावर बचाव पक्षातर्फे सत्र न्यायालयात अपील करण्यात आले होते. चालक हरगुडे याने भरधाव वेगाने गाडी चालविल्याने अपघात झाल्याचा कोणताही पुरावा सरकारी पक्षाने दिला नसल्याचे ऍड. संकपाळ यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार न्यायालयाने हरगुडे याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)